Advertisement

शेततळ्यात बुडून तीन बालकांचा मृत्यु

प्रजापत्र | Tuesday, 21/03/2023
बातमी शेअर करा

केज – तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून तीन बालकांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यु झाला आहे.

 

        केज पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण सावळेश्वर येथे असलेल्या शेतामध्ये शेततळ्यात मंगळवारी (दि.२१) दुपारी बुडून स्वराज जयराम चौधरी, पार्थ श्रीराम चौधरी आणि श्लोक गणेश चौधरी या तीन 5 ते 8 वर्षीय बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. सदरील घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. मात्र सदरील घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

        दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव चे एपीआय श्री.उबाळे व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Advertisement

Advertisement