Advertisement

जुगार अड्ड्यावर धाड

प्रजापत्र | Monday, 20/03/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - उपविभागीय पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने विनापरवाना चालणार्‍या जुगार अड्ड्यावर धाड मारली. ही कारवाई रविवार दि.19 रोजी रात्री साडेनऊ वाजले च्या दरम्यान माजलगाव शहरानजीक मंजरथ रोड कॅनल जवळ सय्यद जमील यांच्या शेतात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

 

गोपनीय रित्या मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चू यांनी शहर पोलिसांना आदेशित केले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री सापळा रचला.गोपनीय माहितीप्रमाणे शहरानजीक मंजरथरोड जवळील कॅनल जवळच्या शेतात जुगार खेळला जात त्या ठिकाणी धाड मारली. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणार्‍यांना तिघा जणांना रंगेहात पकडले.यावेळी अंधाराचा फायदा घेऊन काही जुगारी पळून गेले. दरम्यान घटनास्थळी पोलिसांना जुगार्‍याकडून 2 लाख 10 हजार 710 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक बालाजी लिंबाजी देवकते यांच्या फिर्यादीवरून 1)शेख उबेद शेख पाशा रा. खंडोबा मैदान माजलगाव,2) शिवाजी चंद्रभान घडसे शेलापुरी माजलगाव, 3)सय्यद इब्राहिम उस्मान रा. अशोक नगर माजलगाव, पळून गेलेले सय्यद जमील,सय्यद अल्ताफ,सय्यद लायक यांच्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.ही कार्यवाही उपविभागी पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.बालाजी देवकते,पोसी.थापडे,भिसे,मिसाळ व गृहरक्षक दलाचे शेख,उंडे यांनी पार पाडली.

 

Advertisement

Advertisement