Advertisement

डिलीट झालेले जुने फोटो मिळवून देतो म्हणत 50 हजाराला गंडविले

प्रजापत्र | Friday, 17/03/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - तुमच्या मोबाईलमधील डिलीट झालेले जुने फोटो परत मिळवुन देतो असे म्हणून एका भामट्याने मोबाईलवर लिंक पाठवुन एकाची 50 हजार रूपयांची फसवणुक केल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामिण पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबद्दल अधिक माहितीअशी की तालुक्यातील गव्हाणथडी येथील शत्रुघ्न सुर्यकांत तांदळे या शेतकर्‍याला एका अनोळखी मानसाचा फोन आला की तुमच्याकडून आजपर्यंत डिलीट झालेले सर्व फोटो तुम्हाला परत मिळतील. जुने कोणतेही फोटो तुम्ही सहज उपलब्ध करू शकता त्यासाठी मी पाठवलेली लिंक ओपन करा आणि माहिती भरा. शत्रुघ्न तांदळे यांनी लिंक ओपन करून माहिती भरताच त्यांच्या खात्यातून 50 हजार रूपये गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शत्रुघ्न तांदळे यांनी माजलगाव ग्रामिण पोलीसात अज्ञात विरोधात तक्रार दिली.

Advertisement

Advertisement