Advertisement

परळी शहरात ३३ लाखांचा गुटखा जप्त

प्रजापत्र | Wednesday, 15/03/2023
बातमी शेअर करा

परळी- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची जिल्हा रात्रगस्त पेट्रोलिंग असल्याने त्यांच्या सोबत सफो ४७५ ढाकणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बांगर दराडे, पोना गिते, चोपणे, चालक पोहे वंजारे असे नाईट पेट्रोलिंग करत परळी शहर येथे आले असता. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक आयशर टेम्पो क्रमांक (एच आर ६९ डी २३०२) मध्ये राजनिवास गुटख्याचा माल भरलेला असून सदरचा टेम्पो परळी ते गंगाखेड जाणाऱ्या रोडवर एन के देशमुख यांचे इंडियन पेट्रोल पंपाच्या बाजूला उभा लावून त्यातील माल काढत आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली दोन पंचांना सोबत घेऊन सदर ठिकाणी  दिनांक १५-०३-२०२३ रोजी मध्यरात्री च्या सुमारास जावून छापा मारला असता सदर ठिकाणाहून गुटख्याचा माल घेवून जणारा आयशर टेम्पो व पोते उचलनरे लोक आम्हाल पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व आयशर टेम्पो व टेम्पो चालक जागीच मिळून आला. त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव साबेर सौंदाना, रा. सुन्नी, ता.पुनाना राज्य हरियाणा असे सांगितले त्याचे ताब्यातील आयशर टेम्पोची पाहणी करताा टेम्पोमध्ये प्रीमियम राज निवास सुग्धी पान मसाला गुटख्याचे ६९ मोठे पोते व सुगंधी तंबाखूचे १४ मोठे पोते असा एकूण ३३ लाख २१ हजार ६०० रुपयांचा गुटख्याचा माल व आयशर टेम्पो किमती १८ लाख रुपये व एक मोबाईल किमती १५ हजार रुपये असा एकूण ५१ लाख ३२ हजार.६०० रुपयांचा माल मिळून आल्याने त्यास सदरचा माल कोठून व कोणाकडून आणला व कोणास देणार आहे असे विचारले असता.  त्याने सांगितलं सदरचा माल इंदोर येथील व्यापाऱ्याकडून आणून परळी येथील व्यापाऱ्यास देणार आहोत. असे सांगतले त्याचे ताब्यात मिळून आलेल्या टेम्पो व गुटख्याचा माल ताब्यात घेवून जप्त करून चालक व माल देणार व घेणार असे एकूण आठ आरोपी विरुद्ध सफो मुकुंद शामराव ढाकणे यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम आंबजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज   कुमावत साहेब सहा फौजदार   मुकुंद ढाकणे बाबासाहेब बांगर,  राजू वंजारे, बालाजी दराडे,दिलीप गीते,विकास चोपणे यांनी केली आहे

Advertisement

Advertisement