Advertisement

माजलगाव येथील जुगार अड्यावर पोलिसांची धाड...!

प्रजापत्र | Monday, 13/03/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - माजलगाव शहरा जवळ असणाऱ्या एका फार्म हाऊसमध्ये पोलिसांनी रविवारी दि. १२ रोजी रात्री धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान जुगार्यांकडून पोलिसांनी ६ लाख ८४ हजार रुपयास मुद्देमाल जप्त केला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, गुप्त खबऱ्यामार्फत अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांना माहिती मिळाली की माजलगाव येथील एका फार्म हाऊस मध्ये जुगार खेळल्या जात आहे. त्यानुसार स.पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस हवालदार तागड, पोलीस शिपाई सुरवसे, पोलीस शिपाई आतकरे, पोलीस शिपाई खंदारे यांनी माजलगाव गाठले व येथील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार एस. बी. मोरे व पोलिसावलदार भंडाने यांना सोबत घेऊन फार्म हाऊस वर भंडाने यांना सोबत घेऊन फार्म हाऊस वर धाड टाकली. यावेळी पोलिसांना संबंधित शेतामध्ये जुगार खेळणारे जुगारी दिसून आले. दरम्यान पोलिसांनी यावेळी दोन मोटरसायकल,एक चार चाकी वाहन, सात मोबाईल,असा एकूण ६ लाख ८४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी यावेळी विठ्ठल पांडुरंग सोळंके, रघुनाथ आत्माराम मते, दत्ता त्र्यंबक कोरडे, शिवाजी भगवान राऊत वासुदेव रखुमाई वीरभद्र पंचा स्वामी,अरविंद दिगंबर नाईकनवरे, यांच्यासह आन्य एक जनावर मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

Advertisement

Advertisement