Advertisement

बोलेरोचा अपघात, सात ठार

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

पाटोदा: बोलेरो आणि ट्रक च्या अपघातात ७ जण ठार झाल्याची घटना वैद्यकिन्ही ता. पाटोदा येथे घडली आहे. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. मयत हे सर्व निवडुंगवाडी (ता. बीड )येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बोलेरो गाडीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला असुन मयतांमध्ये दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार भरधाव वेगातील बोलेरो ट्रकवर आदळली
बोलेरोतील लोक नातेवाईकांची दारु सोडविण्यासाठी जात होते अशी माहिती आहे. मयतांमध्ये वैजनाथ ज्ञानोबा तांदळे, बाळू पंढरीनाथ मंडे, केसरबाई बन्सी मुंडे , अशोक गबरू मुंडे,असराबाई भिमराव मुंडे ( सर्व रा.निवडुंगवाडी ता.जि बीड) यांचा समावेश आहे.मयतांमधील एकजण ऊसतोड मुकादम असुन त्याचीच दारु सोडविण्यासाठी हे लोक जात होते ही माहिती आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement