Advertisement

राष्ट्रवादी युवकच्या ‘एक बुथ शंभर युथ’ मोहिमेला परळीतून आरंभ

प्रजापत्र | Sunday, 12/03/2023
बातमी शेअर करा

परळी दि.12 (प्रतिनिधी): माजी पालकमंत्री तथा आ.धनंजय मुंडे यांच्या परळी मतदार संघातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि.12) ‘एक बुथ शंभर युथ’ मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण यांच्या उपस्थितीत या मोहिमेला परळीतून सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी बांगर यांनी युवती, महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

बाळा बांगर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हाभरात तरुणांची मोट बांधण्यासोबत पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचा निर्धार केला आहे. रविवारी आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीतून त्यांनी एक बुथ शंभर युथ मोहिमेला सुरूवात केली. परळीत या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. बैठकीच्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बाळा बांगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून युवती, महिलांचे  प्रश्‍न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे सांगितले.  येणार्‍या काळात बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तरुण आणि युवतींची मोट बांधणार असून जिल्हाभरात आपण ‘एक बुथ शंभर युथ’ मोहिम राबविणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण यांनी शरददूत (आरोग्यसेवक) विषयी उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदचे  गटनेते अजय मुंडे, वाल्मिक कराड, बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माणिक फड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लक्ष्मण पवळ, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष शिल्पा मुंडे, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष श्रीमती दहिफळे व परळी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Advertisement

Advertisement