Advertisement

सहकाऱ्याकडून महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी

प्रजापत्र | Friday, 10/03/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई : व्यसनमुक्ती केंद्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टरकडे शरीर सुखाची मागणी करून तिला मनोरुग्ण ठरवून वेशव्यवसाय करण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवजिवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील, संचालक राजकुमार सोपान गवळे आणि ओम डोलारे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

 

या संदर्भात डॉ. शोभा ( नाव बदलेले आहे) यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नवजिवन व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा ता. अंबाजोगाई येथे माझी नियुक्ती करण्यात आली होती. त्या दिवसी मी तेथे हजर होवुन कामकाजाला सुरवात केली. माझ्या सोबत ड्युटीला इंटर राजकुमार सोपान गवळे, ओम डोलारे, संचालीका अंजली पॉटील हजर होते. मी सलग तीन महीने काम केले. परंतु माझी पगार देण्यात आली नाही. त्यानंतर तीन महिन्यांनी एकदाच पगार केली. 

 

दरम्यान, तेथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीस असलेले डॉ. राजकुमार सोपान गवळे ( रा पाटोदा जळकोट जि लातूर ) हे सतत माझ्या कामात हस्तक्षेपकरून मानसिक त्रास देत. तेथील ओम डोलारे हा व्यक्ती हा 12 वी पास असून मुदत संपलेल्या गोळ्या तेथील रुग्णांना देतो. मी दिनांक 15/12/2022 रोजी दुपारी दोन वाजता त्यांना विचारण्यासाठी गेले असता तो मला मारण्यासाठी अंगावर धावून आला. डॉ. गवळे याच्याकडे तक्रार केली असता त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

 

दिनांक 31/12/2022 रोजी कामावर असताना डॉ. गवळेने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. विरोध केला असता मला झोपेचे इंजेक्शन देऊन बळजबरीने तेथे बंद केले. तसेच माझ्या घरच्यांना फोन करून माझ्यावर मानसिक परिणाम झालेला असल्याचे सांगितले. समोपदेशक प्रदीप पवार यांना फोन करून केंद्रात उपचारासाठी भरतीसाठी नातेवाईकांच्या सह्या घेण्यास सांगीतले. त्यांनी नकार दिला. 

 

त्यानंतर माझ्यावर चुकीचे औषधोपचार करून माझी शारीरिक व मानसिक स्थिती खराब केली. या बाबतीत डॉ. विजय पवार यांना सांगितले. यामुळे संचालिका अंजली पाटील यांनी कोठे काही बोललीस तर येथेच डांबून ठेवीन असे म्हणत मारहाण केली. तसेच वेश्या व्यवसाय करण्याची धमकी दिली. तेथून डिस्चार्ज करतांना काही कागदपत्रांवर बळजबरी सह्या घेतल्या. तसेच जातीवरून शिवीगाळ केली, अशी फिर्याद दाखल केली आहे.

 

या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात राजकुमार सोपान गवळे ( रा. पाटोदा, जळकोट जि लातुर) , अंजली बाबुराव पाटील ( रा. नवजिवन व्यसमुक्ती केंद्र वाघाळा ता. अंबाजोगाई) , ओम डोलारे ( रा. अंबाजोगाई )  9 मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌.

Advertisement

Advertisement