अंबाजोगाई - अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाची माकेगाव व देवळा येथे बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या गुटखा व दारू विक्रीवर धाड टाकली. या कारवाईत 1 लाख 60 हजार 85 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात गुरुवार दिनांक 2 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली कि माकेगाव ता अंबाजोगाई येथे एक इसम चोरुन महाराष्ट्र बंद असलेला गुटखा चोरुन विक्री करत आहे असे कळल्याने तेथे जाऊन पंचासमक्ष चेक केले आसता तेथे विविध प्रकारचा गुटखा 50 हजार रुपये किंमतीचा मिळून आला त्यावरून जयसिंग वाघमारे र माकेगाव यांच्यावर सपोनि रवींद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला.
तसेच त्याच दिवशी दुसरी कारवाई ही अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे अनधिकृत दारू विक्री करणार्यावर झाली. देवळा या गावात श्रीकृष्ण उर्फ राजाभाऊ पवार हा चोरटी देशी दारू व हातभट्टी ची दारू विक्री करताना मिळून आला त्याच्याकडे एकूण देशी तसेच हातभट्टी दारू व एक कार असे 1 लाख 10 हजार 85 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यावर तानाजी तागड यांच्या फिर्यादिवरुन अंबाजोगाई ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.