Advertisement

कारखान्याच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 21/02/2023
बातमी शेअर करा

माजलगाव : (निलेश गरुड) तालुक्यातील जय महेश कारखान्यामध्ये बॉयलरच्या बेल्ट मध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवारी) रात्री ८.३० वाजता घडली.

 

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कल्याण गणपती टोले (वय ४०) रा. आनंदगाव येथील रहिवाशी आहे. तोले हे तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात (शुगर इंडस्ट्री) कामगार म्हणून कामाला होते. आज दि.२१ मंगळवारी कारखान्याचे दुरुस्तीचे काम चालू होते, यावेळी कल्याण टोले हे बॉयलर जवळ काम करत होते. यावेळी अचानक रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान बेलटमध्ये अडकून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत टोले यांचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे. याबाबत अद्याप पोलीस कारवाईची प्रक्रिया चालू आहे. मयत कल्याण टोले याच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई वडील असा परिवार आहे. आनंदगाव मध्ये आठ दिवसात तरुणाचा हा दुसरा अपघाती मृत्यू असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement