वडवणी - शेतामध्ये कुडाच्या घरावरुन गेलेल्या विजेच्या तारेचा शाँट सर्किट होऊन घर जळाले आहे. यामध्ये 55 वर्षीय वयोध्द इसम जळून जखमी झाला आहे.हि घटना वडवणी तालुक्यातील साळींबा येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मधुकर लिंबाजी रणदिवे (वय-55 वर्ष ) हे आई सोबत साळींबा शिवारातील शेतामधील कुडाच्या घरात राहत होते.तर याच घरावरुन महावितरणाच्या विजेची तार गेली आहे.सदरील तारेचा शाँटसर्कट होऊन त्यांची थिनगी कुडाच्या घरावर पडली आणि घराने अचानक पेट घेतला.तर सदरील आग विझविण्यासाठी शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यानी धाव घेतली यामध्ये वयोध्द आई बाहेर काढण्यात यश आले परंतु मधुकर रणदिवे हे काही मिनिट आगीतच राहिले असल्याने यामध्ये ते भाजले जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला पाचारण करुन जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती गांवातील प्रथमदर्शी असणाऱ्यांनी दिली आहे.यामध्ये कुडाचे घर आगीने जळून देखील खाक झाले आहे.
बातमी शेअर करा