Advertisement

तारण दिलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री

प्रजापत्र | Thursday, 16/02/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - तीन लाख रुपयांच्या कर्जापोटी तारण दिलेल्या फ्लॅटची कर्जदाराने पतसंस्थेच्या परस्पर विक्री केली. याप्रकरणी कर्जदारासह जामीनदार आणि खरेदीदारावर अंबाजोगाई शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

अंबाजोगाई येथील एस.एन.एस. ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे वसुली अधिकारी हेमंत नाथराव रेड्डी यांच्या फिर्यादीनुसार श्रीमंत अच्युतराव सोमवंशी (रा. जोगाईवाडी, अंबाजोगाई) यांनी तीन वर्षापूर्वी पतसंस्थेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जासाठी त्यांनी जोगाईवाडी हद्दीतील गोकुळधाम अपार्टमेंटमधील फ्लॅट पतसंस्थेला तारण दिला. दरम्यान, घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड न केल्याने पतसंस्थेने वारंवार संपर्क केला असता कर्ज परतफेड करू शकत नसून तारण दिलेल्या फ्लॅटची सुद्धा विकी केल्याचे श्रीमंतने सांगितले. त्यानंतर पतसंस्थेकडून करण्यात आलेल्या तपासणीत श्रींमंतने बनावट पीटीआर तयार करून रजिस्ट्री ऑफिसची दिशाभूल करत सदरील फ्लॅटची विक्री केल्याचे आढळून आले. सदर फिर्यादीवरून कर्जदार श्रीमंत सोमवंशी, जामीनदार विजय कोंडीराम आगळे व कमलाकर ज्ञानदेव कदम आणि खरेदीदार ईश्वर निवृत्ती गायके या चौघांवर संगनमताने पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

Advertisement

Advertisement