अंबाजोगाई-:आमच्या विरोधात केलेली केस परत का घेत नाहीस? कारणावरून उद्भवलेल्या वादात अंबाजोगाईत गुरुवारी सायंकाळी युवकाचा खून करण्यात आला.या प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शहरातील बाराभाई गल्लीतील रहिवाशी नयुम अली चाऊस (वय-३५) हा सायंकाळी दर्ग्यात दर्शनाला जात असतानाच आरोपी मंजुरअली लायकअली शहा रा. हबीबपुरा परळी, हैदरअली लायकअली शहा, रा. हबीबपुरा परळी, हमिद यासीन पठाण, रा. बालेपीर बीड, व सादेक नुर, रा. मन्यारगल्ली अंबाजोगाई व इतर तीन ते चार अनोळखी यांनी नयुम अली चाऊस यास तु आमचे विरुध्द केलेली केस मागे का घेत नाहीस? तु कोर्टात कशी साक्ष देतो? तेच पाहतो असे म्हणुन मंजुरअली लायकअली शहा व इतरांनी जिवेमारण्याच्या उद्देशाने प्राणघातक शस्त्राने हल्ला करून नयुम अली चाऊस यास मणियार गल्ली परिसरात जीवे मारले. अशी फिर्याद मयताचा भाऊ अन्वर अली चाऊस, वय-४० वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा.बाराभाई गल्ली, अंबाजोगाई, जि. बीड यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.या फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील मंजुरअली लायकअली शहा रा. हबीबपुरा परळी, यास पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर चोरगे करीत आहेत.
आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडीया
प्रकरणातील आरोपी मंजुरअली लायकअली शहा रा. हबीबपुरा परळी यास येथील प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी झेड. झेड. खान यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेतील इतर आरोपींचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.