Advertisement

पन्नगेश्वर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

प्रजापत्र | Thursday, 09/02/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - येथील ३ रे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचे न्यायालयात कि. फौ.अर्ज क्र.68/2023 शांताबाई वि.दिलीप व इतर या प्रकरणाची सुनावणी होवून आरोपी -  १) दिलीप जी.बोरोळे  (एम.डी.), २) एन.पी. नागपुरे, ३) रमेश सोनवणे, (वसुली अधिकारी), ४) विजय गित्ते सर्व रा. पन्नगेश्वर शुगर मिल्स लि. पानगांव ता. रेणापुर जि.लातूर यांचेवर फौजदारी प्रक्रिये अंतर्गत अर्ज दाखल झाला होता त्यामध्ये अंबेजोगाई पोलीस स्टेशन (ग्रामीण) च्या PSO ला भारतीय दंडनीय गुन्ह्यासाठी FIR नोंदवुन चौकशी अहवाल दाखल करण्याचे आदेश एस.डी. मेहता यांनी दि.०८/०२/२०२३ रोजी दिले.

सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी शांताबाई भ्र.विजय राठोड रा. पठाण मांडवा, ता. अंबेजोगाई, जि. बीड. यांनी मा.न्यायालयात फिर्याद दाखल केली की,आरोपी क्र. 1 ते 4 हे पन्नगेश्वर साखर कारखाना लि.चे कर्मचारी आहेत. दि.19/1/2023 रोजी फिर्यादी घरात झोपली होती आणि तिचा मुलगा अभिषेक विजय राठोड आणि तिचा भाऊ अंकुश नामदेव पवार हे ट्रक मध्ये झोपले होते. मध्यरात्री 2.00 च्या सुमारास तिला तिचा मुलगा आणि भावाचा ओरडण्याचा आवाज आला. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की आरोपी क्रमांक 1 ते 4 आणि इतर अज्ञात व्यक्ती तिचा मुलगा आणि भावाला लाथा- बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. तिने आरडाओरडा केला आणि गावकरी तेथे जमा झाले. त्यांनी अर्जदाराचा मुलगा व भावाला सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी व अज्ञात व्यक्तीने त्यांना बेदम मारहाण केली व शेवटी दोघांनाही वरील ट्रकमध्ये बसवून जबरदस्तीने घेऊन गेले. नंतर तिला शेजाऱ्या कडून कळले की तिच्या मुलास व भावास पळून नेणारी लोक हे ते पन्नगेश्वर साखर कारखाना पानगाव तालुका रेनापुर जिल्हा लातूर या साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत. तिने सदरची घटना तात्काळ बाहेरगावी असलेल्या तिच्या पतीला सांगितली. दुसर्‍या दिवशी अर्जदार आणि तिचा नवरा वरील साखर कारखान्यात पोहोचले. त्यांना तेथे काम करणाऱ्या इतर मजुरांकडून समजले की, काल रात्री दोन व्यक्तीना कारखान्यात आत घेऊन आले होते. फिर्यादीस कारखान्याच्या गेटच्या आवारात  त्यांचे वरील ट्रक दिसले. तेव्हा तिचा मुलगा आणि भाऊ याना कारखान्यात दाबून ठेवल्याचा तिला विश्वास झाला. त्यांनी ही बाब संबंधित पोलिस स्टेशनला कळवली परंतु पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 ते 4 विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही आणि पोलिसांनी फिर्यादीस न्यायालयाकडून योग्य शोध वॉरंट आदेश आणण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तिने त्या कारणासाठी Cri.M.A.No.45/2023  दाखल केला आणि न्यायालयाकडून शोध वॉरंट आदेश प्राप्त झाला. पोलिसांनी सर्च वॉरंट आधारे त्या साखर कारखान्याची झडती घेतली असता तिचा मुलगा व भाऊ तेथे सापडले नाहीत. पोलीस शिपाई यांच्यावर राजकीय दबाव असून त्यांनी त्या कारखान्याची योग्य ती झडती घेतली नसल्याचा अर्जदाराचा आरोप आहे. कथित घटनेनंतर अर्जदार आणि तिच्या पतीला आरोपी क्रमांक एक ते चार कडून खंडणीचा फोन आला. त्यांनी फिर्यादी व तिचे पतीकडे 6 लाख रुपयांची मागणी केली आणि मागणी पूर्ण न केल्यास तिच्या मुलाला आणि भावाला ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या पतीचे मोबाईलवर आरोपी सोबत झालेले फोन कॉल संभाषण रेकॉर्ड झाले व ते संभाषण सीडी द्वारे फिर्यादीने माननीय न्यायालयत दाखल केले त्यानंतर पुन्हा फिर्यादीने 01/02/2023 रोजी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी आरोपी क्र.1 ते 4 विरुद्ध कोणतीही कारवाई दाखल केली नाही  त्यामुळे फिर्यादीने त्याबाबतचा अर्ज वरिष्ठ अधिकार्‍याकडे पाठवला आहे परंतु राजकीय दबावामुळे आरोपीवर कोणतीही कारवाई होत नाही.  आरोपी क्रमांक 1 ते 4. यांनी अर्जदाराचे मुलगा आणि भाऊ यांचे अपहरण केलेले असून आरोपी क्र. 1 ते 4 यांच्यावर 20 दिवसांपासून पोलिस यंत्रणा कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे अर्जदाराला हा अर्ज दाखल करावा लागला.

मा.न्यायालयाने अर्जदाराच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून 
अंबाजोगाई पोलीस स्टेशन (ग्रामीण) यांना गुन्ह्याची नोंद करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
 सदरील प्रकरणात फिर्यादी तर्फे अँड.सचिन विलासराव कुलकणी यांनी काम पाहिले व त्यांना अँड.दिपक कदम व 
अँड. संतोष देशपांडे यांनी सहकार्य केले.

Advertisement

Advertisement