Advertisement

विद्यार्थ्यांना बिघडवतेय ChatGPT

प्रजापत्र | Wednesday, 08/02/2023
बातमी शेअर करा

ओपन AI चे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे संचलित चॅटबोट - चॅटजीपीटी आल्यापासूनच ते युझर्सचे फेव्हरेट बनलेले आहे. युझर्समध्ये याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, बंगळुरूच्या अनेक महाविद्यालयांत याच्यावर बंदी घालण्याची मागणी आता होत आहे. बंगळुरूच्या आरव्ही विद्यापीठाने यावर बंदीही घातली आहे.

भारताशिवाय चॅटजीपीटीवर जगातील वेगवेगळ्या शहरांतील शाळांमध्ये आधीच बंदी घालण्यात आली आहे. न्यूयॉर्क सिटी डिपार्टमेन्ट ऑफ एज्युकेशन, सिएटल पब्लिक स्कूल, फ्रानच्या टॉप विद्यापीठात समावेश असलेल्या सायन्स पो विद्यापीठानेही यावर बंदी घातली आहे. या विद्यापीठांचे म्हणणे आहे की यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.एक जानेवारी रोजी बंगळुरूच्या महाविद्यालयांतून सर्क्युलर काढण्यात आले की, कोणताही विद्यार्थी फायनल सबमिशनसाठी चॅटजीपीटी आणि यासारख्या कोणत्याही AI तंत्रज्ञानाची मदत घेणार नाही.

 

 

चॅटजीपीटी काय आहे?
चॅटजीपीटी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत सॉफ्टवेअर आहे. पूर्ण नाव चॅट जेनरेटिव्ह प्रीटेन्ड ट्रान्सफॉर्मर. ओपनसोर्सच्या वेबसाईटवर जाऊन युझर्सना चॅटजीपीटीच्या आयकॉनवर क्लिक करावे लागते आणि चॅटद्वारे आपले प्रश्न विचारावे लागतात.

 

 

लॉन्च झाल्यावर 5 दिवसांतच 10 लाख युझर्स
याचे संस्थापक टेस्ला-ट्विटरचे मालक एलॉन मस्क आणि ओपन एआयचे मालक सॅम ऑल्टमन या दोघांनी 2015 मध्ये यावर काम सुरू केले होते. नंतर मस्क यांनी ओपनएआय कंपनी सोडली. गेल्या वर्षी 30 नोव्हेंबरला हे लॉन्च करण्यात आले. लॉन्च झाल्यावर पाचच दिवसांत याचे 10 लाख युझर्स झाले होते.

 

 

गूगलसाठी मानला जात आहे धोका
काही महिन्यांतच लोकांमध्ये चॅटजीपीटी खूप लोकप्रिय झाले. याचे साधे कारण आहे, कमी वेळात सर्वोत्तम उत्तर देणे. युझर्सनी यावर एक शब्द लिहावा किंवा त्यांना रिसर्च हवा असेल तर तो सविस्तर उत्तर देऊ शकतो. तेही काही मिनिटांत. युझर्स याचा वापर व्हिडिओ स्क्रिप्ट, कविता, निबंध, कव्हर लेटर, रजेचा अर्ज यासोबतच कोणतीही गोष्ट सखोलपणे समजून घेण्यासाठीही करू शकतात. म्हणूनच याची तुलना गूगलसोबत केली जात आहे. तथापि, चॅटजीपीटी आणि गूगलमध्ये फरक आहे. गूगलवर काहीही सर्च केल्यावर ते माहितीसोबत व्हिडिओ आणि संबंधित लिंक, ब्लॉगचेही ऑफ्शन देते. तर चॅटजीपीटी चॅट बॉक्सविषयीची उत्तरे.

 

 

चुकीची उत्तरेही देत आहे चॅटजीपीटी
शशी थरूर यांच्या इंग्लिशमध्ये रजेचा अर्ज लिहिण्यापासून ते इतर अनेक कठीण प्रश्नांची उत्तर देणारे हे सॉफ्टवेअर अनेकदा चुकीचे उत्तरही देत आहे. असे यामुळे होत आहे कारण याची माहिती जानेवारी 2021 च्या जागतिक घटनांपर्यंतच मर्यादित आहे. यामुळे युझर्सना काहीवेळआ चुकीचे किंवा असंगत उत्तर मिळते. जसे की एका युझरने ऑस्करविषयी प्रश्न विचारल्यावर किती भारतीयांनी आतापर्यंत ऑस्कर पुरस्कार जिंकला असा प्रश्न विचारल्यावर चॅट जीपीटीने चुकीचे उत्तर देताना 2021 पर्यंत केवळ भानू अथय्यांचेच नाव लिहिले.

 

 

तर काही दिवसांपूर्वीच निशांत विजयन नावाच्या युझरने चॅटजीपीटीला शशी थरूर स्टाईलमध्ये रजेचा अर्ज लिहिण्यास सांगितले. चॅटबॉटने अशी इंग्रजी लिहीली की ती व्हायरल झाली. मात्र आथा शशी थरूर यांनी निशांत याचे ट्विट रिट्विट करत काही लिहिले तेव्हा लोकांना डिक्शनरीचा आधार घ्यावा लागला.

 

 

AI मुळे लोकांची नोकरी जाण्याचाही धोका
चॅटजीपीटी जे लोकांना मदत करत आहे ते सध्या तरी लोकांना चांगले वाटत आहे. मात्र लोकांच्या नोकरीसाठीही हा धोका होऊ शकतो. कृत्रिम बुद्धीमत्तेवर ज्या पद्धतीने सातत्याने काम होत आहे आणि भविष्याविषयी बोलले जात आहे, ते लोकांच्या नोकरीसाठी धोका असल्याचे सांगितले जात आहे. चॅटजीपीटीविषयी एलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते - 'चॅटजीपीटी खूप चांगले आहे. आपण एका धोकादायक आणि मजबूत कृत्रिम बुद्धिमत्तेपासून थोडेच दूर आहोत.

 

 

AI जगासाठी धोका का आहे?
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणाऱ्या धोक्याविषयी टेक कम्युनिटीत दीर्घ चर्चा सुरू राहते. त्यांचे म्हणणे आहे की आता भलेही जितके सोपे आणि चांगले वाटत आहे. नंतर एआय लोकांसाठी अडचणी निर्माण करेल. एआय ऑटोमेशनमुळे लोकांच्या नोकऱ्या जातील. राजकारणासाठी एआय अल्गोरिदममुळे समाजात चुकीची माहिती किंवा द्वेष पसरू शकतो. असे झालेही आहे.
 

Advertisement

Advertisement