Advertisement

पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर

प्रजापत्र | Tuesday, 07/02/2023
बातमी शेअर करा

केज - तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका वस्तीवर पतीने पत्नीचा गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याची घटना आज मंगळवारी ( दि. ७ ) दुपारी उघडकीस आली. या घटनेने केज तालुका हादरला असून घटनास्थळी एएसपी पंकज कुमावत यांनी भेट दिली. खून करुन पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

आरती भगवान थोरात ( वय २७ वर्ष ) रा. चौसा वस्ती ढाकेफळ ( ता. केज ) असे मयत महिलेचे नाव आहे. आज मंगळवारी ( दि. ७ ) दुपारी ३:२० सुमारास वस्तीवरच पती भगवान शाहूराव थोरात याने पत्नी आरती थोरात यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. या नंतर पती भगवान थोरात हा स्वतः युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात पोचला. घटनेची माहिती दिली. पोलीसांनी त्यास अटक केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच केजचे आयपीएस पंकज कुमावत यांनीही घटनास्थळी भेट दिली. या खूना मागील कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपासात ते स्पष्ट होईल.

Advertisement

Advertisement