बीड (प्रतिनिधी) - रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे, सर्व सामान्य लोकांसह विद्यार्थ्यांनाही रस्त्या अभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर नाहीत या मुद्यावरून आक्रमक झालेल्या तरूणाने बीडमध्ये येवुन शोले स्टाईल आंदोलन केले. वाहिरा (ता.आष्टी) येथील तरूण आज दुपारी बालेपीर भागातील पोलीस पेट्रोल पंपासमोर असलेल्या टॉवरवर चढुन बसला होता. आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे मागील आठ वर्षांपासून रस्त्यांची अवस्था बिकट झालेल आहे. दोन महिन्यापुर्वी शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये ते जखमी झाले होते. वाहिरा ते झांजे वस्ती (सालाई वस्ती) सिमेंट काँक्रेट रोड करून देण्याचे आदेश द्यावेत, तरटे वस्ती,भवरा वस्ती ते वाहिरा येथे 3 किलोमीटर सिमेंट काँक्रेट रस्ता करावा तसेच ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी अशोक शिवाजी माने या तरूणाने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्याच निवेदनात त्याने शोले स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अशोक शिवाजी माने हा तरूण आज दुपारी बालेपीर भागातील मोठ्या टॉवरवर चढुन बसला होता. सकाळी 10.30 वाजता चढलेला तरूण दुपारी 2 वाजेपर्यंत खाली उतरलेला नव्हता. या प्रकाराची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीसांसह जिल्हा आरोग्य अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले होते.
बातमी शेअर करा