Advertisement

माजलगाव तेलगाव रोडवर अपघात

प्रजापत्र | Wednesday, 01/02/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - माजलगाव ते तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ स्विफ्ट गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये लहामेवाडी येथील तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज (ता.१) रात्री ८.३० वाजता घडली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, लहामेवाडी येथील तरुण लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३२), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय ३०) व आण्णासाहेब बळीराम खटके हे तेलगाव येथील कापूस जिनिगवर कामासाठी जात असे. काम आटोपून आज (ता.१) रात्री ८.३० वाजता तेलगवहून लहामेवाडीकडे परत येत होते. या दरम्यान त्यांना माजलगाव – तेळगाव रोडवर माजलगावकडून येणाऱ्या स्विफ्ट कारने (MH04,GD1995) जोराची धडक दिली. गाडीची धडक इतकी मोठी होती की, त्यात लहामेवाडी येथील दुचाकीवरील लक्ष्मण कापसे, आण्णासाहेब खटके हे जागीच ठार झाले. तर नितीन हुलगे यास उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास ही डॉक्टरांनी मयत घोषित केले. यातील तीन ही तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने माजलगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement