बीड (प्रतिनिधी)ः- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी अॅड.संगिता चव्हाण यांची निवड करत जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाचा कारभार अॅड. संगिता चव्हाण यांच्या हाती देत जिल्ह्याची धुरा संभाळण्याचे सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेबांचा विचारांवर कायम सक्षम राहत पक्षासाठी तसेच पक्षाच्या हितासाठी आणि जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी कायल लढा देत उभा राहिलेल्या अॅड. संगिता चव्हाण यांच्या हाती पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण जिल्ह्याची धुरा संभाळण्याचे सुत्र हाती दिले आहे. मागील अनेक वर्षापासून उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेन प्रमुख अदित्यजी ठाकरे यांच्या विचार धारेवर पक्ष संघटना वाढीसाठी तसेच जनसामान्याच्या प्रश्नावर आवाज उठवत लढा देण्याचे काम करत असलेल्या अॅड.संगिता चव्हाण यांच्याकडे महिला जिल्हा आघाडीचे सुत्र दिले आहे. तरी त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय सामाजिक संघटनेकडून शुभेच्छाचा वर्षाव केला जात असून पुढील कार्यास शुभेच्छा दिला जात आहे.