अंबाजोगाई - एका अनोळखी व्यक्तीने एटीएममधुन पैसे काढुन देतो असे म्हणत एटीएम कार्डची अदलाबदल करून आणि त्यांचा पिन नंबर पाहुन 97 हजार रूपये बँक खात्यातुन काढुन घेतल्याचा प्रकार अंबाजोगाईत घडला. अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथील सेवानिवृत्त बस चालक दिवाकर भगवानराव दळवे हे अंबाजोगाई येथील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी पैसे निघत नसल्याने तिथे उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाने पैसे काढुन देतो असे म्हणुन एटीएम कार्डची अदलाबदल करून आणि पिन नंबर पाहुन दळवे यांच्या खात्यातील 97 हजार रूपये काढुन घेत त्यांची फसवणुक केली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.ह.गायकवाड करीत आहेत.
बातमी शेअर करा