Advertisement

विजेचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 25/01/2023
बातमी शेअर करा

केज - केज तालुक्यातील पिंपळगाव येथे ज्ञानेश्वर सुरवसे आणि त्यांची पत्नी इंदूबाई सुरवसे हे दोघे पती-पत्नी आज बुधवार दि. २५ जानेवारी रोजी पहाटे ४:०० च्या दरम्यान पाणी गरम करण्याच्या प्रयत्नात असताना हिटरचा शॉक लागून दोघांचाही मृत्यू झाला. घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि  पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे दाखल झाले आहेत.

Advertisement

Advertisement