परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷ करुणा शर्मा यांनी फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून सोमवारी (दि. 23 ) रात्री पावणे अकराच्या सुमारास करूणा शर्माच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा  नोंदविण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की ,शहरातील पंचवटीनगर भागात राहणारे बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर करुणा अशोक शर्मांच्या पोस्टवर कमेंट केली होती. त्यावरून, तु कमेंट का केली? असे विचारात बालाजी दहिफळे यांना करूणा शर्मा यांनी शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. करुणा शर्मांच्या अन्य एका सहकार्याने देखील  फोनवरून शिविगाळ केली, हा प्रकार 22 जानेवारी रोजी घडला आहे. याप्रकरणी 23 जानेवारी रोजी बालाजी ज्ञानोबा दहिफळे ( 36 , रा. पंचवटी नगर, परळी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून करुणा शर्मांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  परळी शहर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.

	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              