Advertisement

राज ठाकरे गोपीनाथ गडावर नतमस्तक

प्रजापत्र | Wednesday, 18/01/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ  - महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.  यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

  न्यायालयीन कामानिमित्त राज ठाकरे आज शहरात आले होते. मुंबईहून हेलिकॉप्टरने  सकाळी 10.30 वा. गोपीनाथ गडावरील हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाले. हेलिकॉप्टरमधून उतरताच सर्वात प्रथम त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.'अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब, अमर रहे' घोषणांनी गडाचा परिसर यावेळी दुमदुमून गेला होता. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, अनिल तांदळे, उदगीरकर,  दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष ॲड राजेश्वर देशमुख, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक व्यंकटराव कराड, केशव माळी, गणपत बनसोडे, उत्तमराव माने, रवि कांदे, चंद्रकांत देवकते, अजय गिते, गोविंद मुंडे, महादेव इटके, उमेश खाडे, राजेंद्र ओझा, नितीन समशेट्टे, आश्विन  मोगरकर, सुशील हरंगुळे, गणेश होळंबे, पवन तोडकरी, विकास हालगे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Advertisement

Advertisement