अंबाजोगाई - जबरदस्तीने 10 हजार रूपयांच्याहप्त्याची मागणी केल्यानंतर हप्ता देण्यास नकार दिल्याचाराग मनात धरून तिघांनी तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना अंबाजोगाई शहर हद्दीत घडली. या प्रकरणी तिघांविरूध्द कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई येथील शेख नदीम शेख जिलानी (वय34) हे एका पान सेंटरवर थांबले असता त्याठिकाणी आलेल्या तिघांनी शेख नदीम यांच्यासह त्यांच्या भावाकडे 10 हजार रूपयाची हप्त्याची मागणी केली. मात्र नकार देताच शेख नदीम यांच्यासह शेख अजीम या दोन्ही भावावर चाकू हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शेख नदीम यांच्या फिर्यादीवरून रियाज खान इकबाल खान पठाण (रा.बिलाल नगर अंबाजोगाई), शेख साहेल शेख जलील, सय्यद मोहम्मद सय्यद सादेक या तिघांविरूध्द कलम 307,384,34 भांदवी प्रमाणे अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असुन पुढील तपास सपोनि घोळवे करीत आहेत.
बातमी शेअर करा