Advertisement

बीडमध्ये इंटरनेट कॅफे चालकाचे घर लुटले

प्रजापत्र | Monday, 16/01/2023
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) - शहरातील बलगुजर धानोरा रोड भागातील इंटरनेट कॅफे चालक प्रविण सुभाष ढास यांच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी
हजारोंचा ऐवज लंपास केला. बीड शहरातील प्रविण ढास यांच्या घरातील सदस्य केज तालुक्यात गेले होते. प्रविण ढास हे घरात एकटे असतांना काल रात्री अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून 30 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. आज सकाळी शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि.केतन राठोड, पीएसआय सुरेश वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ञ आणि श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement