Advertisement

भाजपा नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा अपघातात मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 14/01/2023
बातमी शेअर करा

माजलगाव : येथील भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप हे औरंगाबाद हून माजलगावला काम आटोपून परत येत असताना शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान गेवराई जवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्याचा मित्र आर्यन कंटुले हे काही कामा निमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून गावी माजलगावकडे येत असताना गेवराई जवळ शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चार चाकी वाहनावरील (क्रेटा MH 44, T 5152) विश्वजित याचा ताबा सुटल्याने आयसर (टेम्पो) ला धडक बसली. यात विश्वजित यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासह असलेला मित्र आर्यन कंटुले हा सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने वाचला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली. विश्वजीत जगताप यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement