Advertisement

वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीचा मृत्यू

प्रजापत्र | Sunday, 08/01/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ - चारचाकी वाहन वेगाने मागे घेत असताना सकाळी फिरण्यास निघालेल्या व्यक्तीचा वाहणाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना रविवार दि 8 रोजी सकाळी घडली.
या बाबतीत मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळी शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेले दादाराव गोविंदराव मस्के ( वय 70 ) हे रविवार दि 8 रोजी सकाळी मर्निग वॉक करिता घराबाहेर पडले असता ईटके कॉर्नर चौकात भरधाव वेगात चारचाकी गाडी मागे घेत असताना गाडीचा खाली आल्याने  त्यांचा अपघात झाला.या अपघातात ते गंभीर जखमी झाले.दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याने त्यांचा प्राण सोडलेला होता. दवाखान्यात नेताच डॉक्टरानी त्यांना मयत घोषित केले. परळी उपजिल्हा रुग्णालयात हिव-ताप मलेरिया विभागातील कर्मचारी रणजित मस्के यांचे ते वडील होते. परळी शहरात ह्या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

Advertisement