परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷
परळी तालुक्यातील सरफराजपूर येथे लांडग्यांनी हल्ला केला असून यामध्ये शेळी पालन करणाऱ्याच्या 6 शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या आहेत.याबाबत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना माहिती कळताच त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
परळी तालुक्यातील सरफराजपूर हा बालाघाटाच्या डोंगर पट्ट्यात येणारा भाग असून या भागात अनेक वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे.मोर,हरीण यासोबत अनेक वन्य प्राणी या भागात दिसून येतात.शनिवार दि 7 रोजी या परिसरात असलेल्या सरफराजपूर येथील भरत रामभाऊ घाडगे या पशुपालकाच्या शेळयावर लांडग्यानी शनिवार रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान हल्ला केला.या मध्ये त्यांच्या 6 शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या आहेत.
या घडणेची माहिती समजताच महसूल विभागाचे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी वनविभाग, पोलील यांना पंचनामा करण्यासाठी कळवले आहे.
बातमी शेअर करा