Advertisement

देशीदारू चा साठा जप्त

प्रजापत्र | Saturday, 07/01/2023
बातमी शेअर करा

माजलगाव दि.०७ (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकरवण येथे अवैध दारू विक्री साठी आणली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून आयपीएस डॉ. बी. धीरज कुमार यांच्या पथकाने शनिवारी (दि.०७) रोजी सापळा रचत २४ हजार रुपयांची अवैध देशी दारू पकडली. मात्र यावेळी आरोपींनी पळून जाण्यात यशस्वी झाले, याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

आयपीएस डॉ. बी. धीरज कुमार यांच्या पथकाला शनिवारी (दि.०७) रोजी टाकरवण कडुन सचिन पटेकर रा. टाकरवण व एक इसम मोटारसायकलवर देशीदारूचे बॉक्स घेवुन टाकरवण फाटयाकडे येत आहेत. त्या अनुशंघाने टाकरवण फाट्याकडून टाकरवणकडे जात असताना समोरुन एक मोटारसायकल आली. त्यावर दोन इसम असुन पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये बॉक्स ठेवलेले दिसुन आले. पोलिसांना गणवेशात पाहून मोटारसायकल जोरात पळविली. त्यावर पोलिसांनी पाठलाग केला असता मोटार सायकल चालक याने रोडच्याकडीला गाडी थांबुन गाडीवरील बॉक्स हे प्रज्ञा  हॉटेलच्या समोर ठेवुन ते मोटार सायकलवर बसुन पळुन गेले. पळुन गेलेल्या इसमाच्या नावाची खात्री करिता सचिन सुंदर पटटेकर व भाग्योदय ऊर्फ गोटया मुरलीधर पटेकर दोन्ही रा. टाकरवण असे असल्याचे समजले.याप्रकरणी अवैध देशी दारूच्या विक्री करत असल्या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिन सुंदर पटटेकर व भाग्योदय ऊर्फ गोटया मुरलीधर पटटेकर दोन्ही रा. टाकरवण ता. माजलगाव यांच्या विरुद्ध पोलीस हवालदार रवी शंकरराव राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Advertisement

Advertisement