केज दि.२६ – गुटखा घेऊन निघालेल्या कारला अपघात झाल्याने चालक कार सोडून पळून गेला. केज पोलिसांनी कारची झडती घेत १ लाख १९ हजाराच्या गुटखा व कार असा ३ लाख २५ हजार ९७० रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
केज – धारूर रस्त्यावरून कार ( क्र. महा. १२ न. ब. ३२६२ ) ही २५ डिसेंबर रोजी सकाळी ६.४३ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने साठा, विक्री व वाहतुक करणास प्रतिबंध केलेली सुगंधीत तंबाखु व पान मसाला अन्नपदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु व पान मसाला गुटखा हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी घेवून भरधाव वेगात जात असताना या रस्त्यावरील तांबवा शिवारातील सानेगुरुजी निवासी विद्यालयाजवळ कारला अपघात होऊन कार ही खड्ड्यात गेली. त्यानंतर कार चालक पळून गेला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये लाल रंगाचे रॉयल २२० तंबाखुचे १०२ पुडे, केशरयुक्त हिरा का बाबाजी पान मसालाचे १०२ पुडे असा एकूण १ लाख १९ हजार ३४० रुपयांच्या गुटख्याच्या ६ गोण्या व २ लाख रुपये किंमतीची कार असा ३ लाख २५ हजार ९७० रुपयांचा माल जप्त केला. जमादार उमेश आघाव यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार राजेश पाटील हे पुढील तपास करत आहेत.