Advertisement

केजमध्ये मोटार रिपेरिंगचे दुकान फोडले

प्रजापत्र | Thursday, 22/12/2022
बातमी शेअर करा

 केज दि.२२ - अज्ञात चोरट्यांनी एका विद्युत मोटार रिपेरिंग दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील ५० हजार ६९७ रुपयांचे विविध प्रकारचे मोटार रिवायडिंग वायर चोरून नेल्याची घटना केज शहरातील धारूर चौकात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

           केज शहरातील शुक्रवार पेठ भागातील संतोष दत्तू ईगवे यांचे धारूर चौकातील रवी दांगट यांच्या गाळ्यात संत ज्ञानेश्वर माऊली मोटार रिपायरिंग ॲन्ड ईलेक्ट्रीकल्स नावाचे मोटार रिपेरिंगचे दुकान आहे. सध्या विद्युत मोटार भरून देण्याचा सिजन असल्याने त्यांनी भरपूर समान खरेदी करून दुकानात ठेवले होते. १८ डिसेंबर रोजी रात्री संतोष ईगवे हे दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानाची झडती घेत दुकानातील १२ हजार ७८ रुपयांचे जीएमडब्ल्यू १ एमएमचे मोटार रिवायडिंग वायर १४.२१० किलो, १० हजार ९८२ रुपयांचे १.१ एमएमचे मोटार रिवायडिंग वायर १२.९२० किलो, ११ हजार ४९६ रुपयांचे जीएमडब्ल्यू १.३ एमएमचे मोटार रिवायडिंग वायर १३.५२५ किलो, १६ हजार १४१ रुपयांचे एसडब्ल्यू २१ एमएमचे मोटार रिवायडिंग वायर १८.९९० किलो असे ५० हजार ६९७ रुपयांचा  माल घेऊन चोरटे पसार झाले. दुकानदार संतोष ईगवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक महावीर सोनवणे हे तपास करताहेत. 
 

Advertisement

Advertisement