बीड-पाटोदा तालुक्यातील भायाळा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी सत्यभामा बांगर प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. निकालानंतर गावकऱ्यांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली होती. तर पाटोदा शहरात मोठया क्रेनने हार घालत त्यांचे व विजयी सदस्यांचे भव्य स्वागत करण्यात केले.
पाटोदा ग्रामपंचायतसाठी रविवारी मतदान झाल्यानंतर मंगळवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सरपंच पदासाठी सत्यभामा बांगर उमेदवार होत्या. त्यांचा 489 मतांनी दणदणीत विजय झाला. तर बांगर सोनाजी लक्ष्मण,पुष्पा राजेंद्र बांगर,बांगर मुरलीधर बापूराव,बांगर कांताबाई तात्यासाहेब,बांगर मनीषा शिवाजी यांचा 376 ते 382 मतांच्या फरकाने विजय झाला आहे. दरम्यान यापूर्वीच चार सदस्य बिनविरोध निघाले होते.
बातमी शेअर करा