Advertisement

राहुल सोनवणे यांची बजरंग सोनवणे यांच्यावर मात

प्रजापत्र | Tuesday, 20/12/2022
बातमी शेअर करा

केज दि.२० - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या केज तालुक्यातील सारणी आनंदगाव ग्रामपंचायत चा निकाल जाहीर झाला असून जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी राष्ट्रवादी चे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांच्यावर मात करत राहुल सोनवणे यांनी सारणीची ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.

            सारणी आनंदगाव ग्रामपंचायत कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.बजरंग सोनवणे यांनी त्यांची कन्या हर्षादा सोनवणे सरपंच पदासाठी उभी केली होती.तर राहुल सोनवणे यांनी त्यांची भावजय तथा पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी प्रविना संतोष सोनवणे यांना उभे केले होते.

             सदरील निवडणुक अतिशय अटीतटीची होणार असे मानल्या जात होते.परंतु राहुल सोनवणे यांनी एकलहाती ग्रामपंचायत ताब्यात घेत दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान , बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या मुलीला केजच्या नगरपंचायत निवडणुकीतही उभे केले होते.मात्र तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने बजरंग सोनवणे यांना राहुल सोनवणे यांनी मोठा झटका दिला आहे.

Advertisement

Advertisement