बीड-खंडणी मागणे, चोरी करणे, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे आदी सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाची आज(दि.20) एमपीडीए कायाद्याअंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार ही कारवाई झाली आहे.
आरोपी शेख एजाज शेख अमजद
शेख एजाज शेख अमजद (वय-25 रा. नाळवंडी नाका) असे आरोपीचे नाव आहे. शेख एजाज अमजदवर बीड शहर पोलीस ठाणे, कळंब, आनंदनगर (उस्मानाबाद) पोलीस ठाण्यात खंडणी मागणे, जबरी चोरी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे, शस्त्र बाळगणे यासह सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली असून चार गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. तर गुन्हे पोलीस तपासावर आहेत.शेख एजाज शेख अमजद बीडमधील व्यापाऱ्यांना खंडणी मागून त्रास देत होता. त्याची बीड शहरांत ही मोठी दहशत होती. अनेक प्रकरणात लोक फिर्याद देण्यासाठी पुढे येत नव्हते.त्यामुळे त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.19 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारित केले. त्यानंतर आरोपीला अटक करत त्याची आज हर्सूल कारागृहात रवानगी केली. दरम्यान ही कामगिरी पोलीस निरीक्षक रवी सानप, सपोनि अंतराप, दराडे, अविनाश सानप, सुशेन पवार, अभिमन्यू औताडे, मनोज वाघ, शेख नसीर यांनी केली.