माजलगाव  (प्रतिनिधी)  - माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी उभा केलेल्या पॅनलमधील सरपंच पदाच्या उमेदवाराचा दारून पराभव झाला आहे. त्यामूळे त्यांच्या वाट्याला सरपंच पदाऐवजी आता उपसरपंच पद येणार आहे. ओबीसी प्रवर्गाला राखील असलेल्या सरपंच पदासाठी अशोक डक यांच्या उमेदवाराचा पराभव करुन भाजप गटाकडून उभा असलेल्या वंदना केरबा तपासे यांनी बाजी मारली आहे. ग्रामस्थांनी अशोक डक यांना राजकीय धक्का देत, भाजपचा उमेदवार निवडून दिला आहे. नुकतेच माजलगाव मतदार संघातील धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आ. प्रकाश सोळंके यांना जबरदस्त धक्का बसलेला असतानाच आता त्यांचे विश्वासू अशोक डक यांना देखील धक्का बसला  आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पारडे  तूर्तास कमी होतांना दिसून येत आहे .दरम्यान वंदना तपसे यांचे पती केरबा तपसे सामान्य कुटूंबातून असून गावचे कोतवाल असल्याने मतदारांनी त्यांना सरपंच पदाचा कौल दिला आहे.
 

	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              