Advertisement

राजुरिची वाजणार पहिली शिट्टी १६ फेऱ्यांमध्ये होणार बीड तालुक्याची मतमोजणी

प्रजापत्र | Monday, 19/12/2022
बातमी शेअर करा

बीड: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी बीड जिल्ह्यात रविवारी ८० टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान झाल्यानंतर आता प्रत्येकाला मतमोजणीची प्रतिक्षा आहे. मंगळवारी सकाळी १० वा. बीडच्या आयटीआय मध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. १६ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून पहिल्या फेरीची सुरुवात नवगण राजुरी पासून होणार आहे. 
बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी सकाळी १० वा. मतमोजणी सुरू होणार आहे. २६ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. १६ फेऱ्यांमध्ये गावांची विभागणी करण्यात आली आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या नवगण राजुरीचा समावेश पहिल्या फेरीत तर म्हाळस जवळयाचा समावेश शेवटच्या म्हणजे १६ व्या फेरीत आहे. म्हणजे हा निकाल सर्वात शेवटी लागणार आहे. 
---
मोबाईलला नाही परवानगी
मतमोजणीसाठी मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवारांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. त्या ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही , तसेच ज्या गावांची मतमोजणी सुरु असेल त्यांनाच प्रवेश मिळेल, म्हणून प्रतिनिधींनी आपले गाव कोणत्या फेरीत आहे याची खात्री करून यावे. मतमोजणी केंद्रात मोबाईल आणता येणार नाही अशी माहिती तहसीलदार तथा राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी सुहास हजारे यांनी दिली. 
---

अशा असतील फेऱ्या 
१ ) राजुरी(न ), उमरड  जहागीर , शहाजनपूर , पिंपरगव्हाण , मुर्शदपूर , लिंबारुइ 
२) सौन्दना , कामखेडा , अव्वलपूर , केतुरा , खपारपांगरी ,तांदळवाडी हवेली , पारगाव शिरस , बहाद्दरपूर 
३ ) बेलुरा , रुद्रापूर , साक्षाळपिंप्री , पिंपळनेर , बऱ्हाणपूर , आडगाव , इट 
४ ) वडगाव गुंदा , संडरवन , नाथापुर , कुक्कडगाव , ताडसोन्ना ,परभणी , पिंपळादेवी , बोरदेवी 
५ ) लिम्बारुई देवी , लोणी , सुर्डी , काठोडा ,आंबेसावळी , काळेगाव हवेली , घाटसावली 
६ ) घाटजवळ , जुजगव्हाण , मण्यारवाडी , माणकूरवाडी , मैंदा , हिवरापहाडी ,कुंटेवाडी , जरुड 
७ ) ढेकणमोहा , बाभळखुंटा , भवनवाडी , वांगी , शिवणी, चाकरवाडी , मांजरसुम्भा, अंधापुरी घाट 
८ ) अंबिलवाडगाव , उदंडवडगाव , कुंभारी , खंडाळा , तांदळवाडी घाट , पोथरा , सफेपुर , साखरेबोरगाव , सावरगाव घाट 
९ ) सातरा , पाली , मांडवजाळी , आहेरवडगाव , कोल्हारवाडी , धनगरवाडी , मंजेरी 
१० ) समनापूर , येळंबघाट , मंदावखेल , काऱेगव्हाण , डोईफोडवाडी , बोरफडी , वडगाव (कळसांबर ), सानपवाडी 
११ ) लिंबागणेश , बेलगाव , पिंपरनाई , करचूंडी , मुलूकवाडी, सोमनाथवाडी , चऱ्हाटा , काकड हिरा 
१२ ) तळेगाव , पाटोदा बेलखंडी , पिंपळवाडी , भाळवणी , चौसाळा , खडकीघाट 
१३ )देवीबाभूळगाव , पालसिंगन , रौळसगाव , हिंगणी (खु ) बोरखेड , अंजनवती , कानडीघाट 
१४ ) गोलंगरी , घारगाव , महाजनवादी , माळेवाडी , लोणीघाट , वनगाव , माळापुरी 
१५ ) आहेरलिंबगाव , कुमशी , नामलगाव  , नंदुरहवेली , पेडगाव , लोळदगाव ,शिदोढ , खांडेपारगाव 
१६ )उम्रदखलसा , कुर्ला , चिंचोळीमळी , नागापूर , म्हालसजवळ , राजुरीघोडका , वाकनाकपुर 

Advertisement

Advertisement