Advertisement

केज बीड रोडवरील पिंपळगाव फाट्यावर ट्रक - कारचा अपघात

प्रजापत्र | Sunday, 18/12/2022
बातमी शेअर करा

केज दि.१८ - मतदान करण्यासाठी पुण्याहुन गावाकडे येत असलेल्या कारचा व ट्रक चा केज बीड रोडवरील पिंपळगाव फाट्यावर अपघात झाला असून तिघे गंभीर असल्याचे समजते.
                तालुक्यातील साबला येथील परळकर कुटुंबातील सदस्य व इतर मतदानासाठी गावाकडे येत होते.रविवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान ते पिंपळगाव फाट्यावर आले असता त्यांच्या कारचा व ट्रक चा अपघात झाला.त्यात सतीश परळकर, सूबीद्रा परळकर आणि कार चालक सिद्धू कांबळे गंभीर जखमी झाले आहेत.

 

             सदरील अपघाताची माहिती मिळताच 108 चे पायलट संजय गिरी आणि डॉ.सचिन सूर्यवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ला पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.दरम्यान रात्रीही औरंगाबाद वरून तालुक्यातील आनंदगाव सारणी येथे येत असलेल्या एका तरुणालाही अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.
 

Advertisement

Advertisement