अंबाजोगाई - अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघा आरोपीस १५ वर्षाचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावला आहे .
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश एस.जे घरात यांचे न्यायालयात सुरु असलेल्या विशेष वाले सत्र केस क ०५/२०१६ महाराष्ट्र शासन वि अमजद मुसा पठाण व एक विधी संघर्ष बालक दोघे रा परळी यांनी गल्लीतील पिडीत मुलास सायकल शिकवण्याचे आमिष दासून व वीस रुपये देऊन सायकलवर वर घेऊन जाऊन बंद शाळेच्या भिंतीवरुन उतरुन बाथरूम मध्ये नेऊन अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला व त्यास शिवीगाळ करुन चापटणे मारहाण करून हि बाब कोणाल सांगितली तर जिवे मारण्याची धमकी दिली. सदरील घटना दि ०५-०३-२०१६ रोजी घडली. या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद होऊन पोलीस अधीक्षक हरीबालाजी यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले. यातील दुसरा आरोपी वयाने लहान असल्याने त्याच्या विरुद्ध बाल न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
सादर प्रकरणात सरकार पक्ष तर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले पिडीताचा जबाब व इतर साक्षी पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून म न्यायालयाने आरोपीस कलम ३७७ प्रमाणे पंधरा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड व कलम ६ वा से अ प्रमाणे पंधरा रुपये दंड व कलम ३२३ प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच कलम ३२३ प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली.
या प्रकरणात आरोपीने पिडीताचा जबाब नोदाविल्या नंतर लहान भावाचे जन्म प्रमानपत्र दाखल करून व साक्षीदार देऊन मी हि लहान आहे त्यामुळे प्रकार बाल न्यायालयास पाठवावे म्हणून अर्ज केला होता. परंतु तो अर्ज खोटा आहे अशे सरकार पक्षाने सिद्ध केले व त्यानंतर पिडीत याच्या आईने आम्ही फिर्याद गैरसमजुतीतून दिले व आरोपीचे व आमचे संबंध चांगले आहेत असे लेखी म्हणणे दाखल केले होते परंतु सरकार पक्षाच्या युक्तीवादा नंतर दोन्हीही कारणे फेटाळले..या प्रकरणात सरकार पक्षा तर्फे अँड. अशोक विनायकराव कुलकर्णी यांनी काम पहिले त्यांना अलड. नितीन पूजदेकर यांनी सहकार्य केले सादर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पो. हे को गोविंद कदम व पो. हे .को. तांदळे यांनी काम पहिले.