Advertisement

गावठी दारूचा साठा जप्त

प्रजापत्र | Thursday, 08/12/2022
बातमी शेअर करा

केज - केज पोलिसांनी चार ठिकाणी छापे मारून ३५०० रुपयांची गावठी दारू व १४९५ रुपयांची देशी, विदेशी दारू पकडली. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

 

      केज पोलीस ठाण्याचे प्रमुख शंकर वाघमोडे यांनी अवैध दारू विक्री आड्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या सहकाऱ्यांनी केज शहरातील क्रांती नगर भागात छापा मारून सुरेखा हरिदास काळे हिच्या घरातून २ हजार रुपयांची २० लिटर गावठी दारू जप्त केली. लव्हुरी येथील पारधी वस्तीवर धाड मारून पोलिसांनी वसंत रुपला पवार याच्या घरातुन १ हजार ५०० रुपयांची १५ लिटर गावठी दारू पकडली. तसेच साळेगाव येथे चंद्रभागा भीमराव पवार हिच्या घरी छापा मारून ८६५ रुपयांच्या देशी दारूच्या ११ बाटल्या व मॅकडॉल विदेशी दारूच्या ३ बाटल्या जप्त केल्या. तर नांदूरघाट येथे छापा मारून अजय सयाजीराव आलाट याच्या ताब्यातील ६३० रुपयांच्या देशी दारूच्या ९ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी सुरेखा काळे, वसंत पवार, चंद्रभागा पवार, अजय आलाट या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement