बीड : जिल्ह्यातील वक्फ जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात आता तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. पांडुळे हे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत आहेत.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वक्फ जमीन घोटाळा प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मागील वर्षी दाखल झालेल्या या गुन्ह्यात नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे आरोपी होते. त्यांना या प्रकरणात फेब्रुवारीमध्ये अटक झाली होती तसेच त्यांना दोन दिवसांनी जामीन देखील मिळाला होता. नंतरच्या काळात त्यांची उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा येथे बदली झाली. आता याच प्रकरणात राज्यशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य मोठे असल्याने सदर कारवाई करण्यात आल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे. वक्फ जमीन प्रकरणात यापूर्वीच तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव निलंबित झालेले आहेत , त्यानंतर आता नायब तहसीलदारांवर कारवाई झाली आहे.
बातमी शेअर करा