Advertisement

'कोरोना विषाणू मानव निर्मित'

प्रजापत्र | Tuesday, 06/12/2022
बातमी शेअर करा

चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञाने कोरोना आणि चीनबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. या शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, कोरोना विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असून ते मानव निर्मित आहे. कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाला आणि नंतर त्याचा प्रसार झाला असा दावाही या शास्त्रज्ञाने केला आहे. वुहानमधील एका प्रयोगशाळेत काम करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने त्याचा पुस्कामध्ये हा दावा केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञ अँड्रयू हफ यांच्या दाव्याच्या आधारे कोरोना विषाणू दोन वर्षांआधी वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी या प्रयोगशाळेतून लीक झाला होता. वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी ही चीन सरकारची प्रयोगशाळा आहे.

 

 

'कोरोना विषाणू मानव निर्मित', शास्त्रज्ञाचा दावा
मागील दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना संसर्गाचा वेग आता मंदावला असला तरी, कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. आता चीनमध्ये काम करणाऱ्या एका अमेरिकन शास्त्रज्ञाने आता दावा केला आहे की, कोरोना विषाणू मानव निर्मित आहे. याआधीची चीनवर हा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून या संदर्भात तपासही करण्यात आला. 

 

 

कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाला : अँड्र्यू हफ
वुहानमधील प्रयोगशाळेत अपुर्‍या संरक्षणासह गेन-ऑफ-फंक्शन प्रयोग केले गेले, परिणामी लॅबमध्ये कोरोना विषाणू तयार झाला, असं हफ यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. 'द ट्रूथ अबाऊट वुहान' या अँड्रयू हफ यांच्या नवीन पुस्तकात अँड्र्यू हफ यांनी दावा केला आहे की, कोरोना महामारी चीनमधील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू लीक झाल्यामुळे आली.

 

 

वुहानमधील प्रयोगशाळेला अमेरिकेकडून निधी?
मीडिया रिपोर्टनुसार, वुहानमधील या प्रयोगशाळेला अमेरिकन सरकार निधी पुरवतो, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. हफ यांच्या पुस्तकातील काही परिच्छेद ब्रिटनच्या 'द सन' वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाले आहेत. न्यू यॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, अँड्र्यू हफ हे संसर्गजन्य रोगांचा अभ्यास करणाऱ्या न्यूयॉर्कमधील 'इकोहेल्थ अलायन्स या ना-नफा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांनी दावा केला आहे की, वुहानमधील ज्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणू तयार करण्यात आला, त्याला अमेरिकन सरकरा निधी पुरवतो.
 

Advertisement

Advertisement