Advertisement

मृत्युच्या ३६ तासानंतरही अंत्यविधी नाही

प्रजापत्र | Monday, 05/12/2022
बातमी शेअर करा

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणादरम्यान मृत्यू झालेल्या आप्पाराव पवार यांचा ३६ तासानंतरही अंत्यविधी झालेला नाही. दोषींवर कारवाई आणि जागा मिळेपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला असून प्रशासन मात्र केवळ बैठकांचा फार्स करण्यात मग्न आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणादरम्यान आप्पाराव पवार यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला होता. मात्र अद्यापही त्यांचा अंत्यविधी झालेला नाही. अद्यापही प्रशासन केवळ बैठकांचा फार्स करित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मयताचे नातेवाईक आणि सामाजिक संघटना एकवटलेल्या असल्या तरी अद्यापही तोडगा निघालेला नाही.

Advertisement

Advertisement