Advertisement

आष्टी तालुक्यात भर दुपारी घरफोडी

प्रजापत्र | Wednesday, 23/11/2022
बातमी शेअर करा

 आष्टी - कुटुंबासह शेतात गेलेल्या शेतकऱ्याचे घर भरदुपारी चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी शेकापूर येथे घडली. चोरट्यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधत ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १७ हजार रोख रक्कम चोरून पाबोरा केला. 

 

 

आष्टी तालुक्यातील शेकापूर येथील भाऊसाहेब किसन फुंदे हे शेतकरी आहेत. मंगळवारी सकाळी ते कुटुंबासह शेतात गेले होते. दुपारी घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडत घरात प्रवेश केला. घरातील लोंखडी पेटीतील ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १७ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास घेतला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात भाऊसाहेब किसन फुंदे याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत.

Advertisement

Advertisement