Advertisement

सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराच्या घरावर दगडफेक

प्रजापत्र | Sunday, 20/11/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२० (प्रतिनिधी) - गेल्या 31 ऑक्टोंबर रोजी सेवानिवृत्त झालेले पेठ बीडचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पि.के. ससाणे यांच्या घरावर अज्ञात हल्ले खोरांनी दगड फेक करुन साठ हजार रुपयाचे नुकसान केले आहे. 

 

गढी येथील त्यांच्या निवासस्थानी 17 नोव्हेंबर रोजी घडली. काल त्यानी पोलीसात तक्रार दिली. सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार पि.के. ससाणे हे आपल्या कुटूंबासह गेवराई तालुक्यातील गढी येथे राहतात.ते 17 तारखेला पुण्याला गेले होते. त्यावेळी रात्री 11.30 वाजता अज्ञात इसमाने त्यांच्या घरावर तुफान दगडफेक करत 60 हजाराचे नुकसान केले. ससाणे यांनी घटनेची माहिती मिळतात काल गेवराई पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर आज सकाळी पोलीसांनी पंचनामा केला. हल्लेखोरांनी हल्ला का केला हे मात्र समजू शकले नाही.
 

Advertisement

Advertisement