Advertisement

दारूचा मुद्देमाल नष्ट

प्रजापत्र | Friday, 18/11/2022
बातमी शेअर करा

 केज दि.१८ - केज पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या छाप्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेली देशी, विदेशी आणि हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आली. 
               सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केज पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसा पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अवैद्य मद्य विक्री व चोरटी वाहतूक यावर कारवाया करून देशी दारू, विदेश मद्य आणि हातभट्टी यासह मद्याचा साठा जप्त करून कारवाई केलेली होती. 

 

           सदरील ताब्यातील मुद्देमाल दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी नष्ट करण्यात आला. यावेळी केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्यासह पोलीस नाईक मतीन शेख, तांदळे, संतोष गीते, महादेव बहिरवाळ, चंद्रकांत काळकुटे, रूखमानंद घोलप यांच्यासह पंच आणि पत्रकार हजर होते.
 

Advertisement

Advertisement