Advertisement

मुलाला वाचवताना आईचाही पाण्यात बुडून मृत्यु

प्रजापत्र | Friday, 18/11/2022
बातमी शेअर करा

केज- तालुक्यातील ऊसतोडणीला गेलेले आई आणि मुलाचा विहिरीत बुडाल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील विठ्ठल साई साखर कारखाना आवारात घडली. चार वर्षाच्या लेकरांला वाचवताना आईला आपल्या जीवाला मुकावे लागले असून बालक व आईचे मृतदेह बचाव पथकांनी काढली आहेत.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील संतोष दशरथ घुले हे आपल्या कुटूंबासह उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात विठ्ठलसाई साखर कारखान्यावर आपल्या बैलगाडीने ऊसतोड करण्यासाठी गेले आहेत. आज दि.18 शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संतोष घुले यांच्या पत्नी सोनाली संतोष घुले (वय 24) पाणी आणण्यासाठी कारखान्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदावर आपल्या 4 वर्षाच्या सोहम या बालकासह गेल्या होत्या. यावेळी शेजारी असलेल्या डबकाड स्वरुप विहिरीत सोहमचा पाय घसरला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी सोनाली याही डबक्यात गेल्या असता पाण्यात दोघेही बुडाले . आपल्या बालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आईला आपला जीव गमवावा लागला. लोकांच्या सदर प्रकार लक्षात येताच गर्दी झाली. यानंतर येथे विहिर असल्याचे सांगण्यात आले. आई असलेल्या सोनाली व मुलाचा मृतदेह शोध लावण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

Advertisement

Advertisement