Advertisement

सोनाई कंट्रक्शन चे संचालक राहुल कराड यांच्यासह तिघावर प्राण घातक हल्ला

प्रजापत्र | Thursday, 10/11/2022
बातमी शेअर करा

परळी दि.१० (प्रतिनिधी) -  तालुक्यातील मांडेखेल येथील ग्रामदैवत असलेल्या असुदेवी यात्रेत सोनाई कंट्रक्शन चे संचालक राहुल कराड यांच्यासह अन्य तीन जणांवर तलवार, कोयते, चाकू व दगडाने प्राणघात हल्ला केल्याची घटना दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी रात्री 10 वाजता सुमारास घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मारुती मुंडे हे करीत आहेत. 

 

 

  राहुल आत्माराम कराड व त्यांचे वडील आत्माराम कराड आसूदेवी यात्रेत दर्शन करून यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या लोकनाट्य पाहण्यासाठी गेले होते. याच दरम्यान लोकनाट्यमध्ये गाणे चालू असताना मांडेखेल येथील विष्णू रासेराव मुंडे हा दारू पिऊन स्टेजवर नाहक गोंधळ घालत होता. यावेळी आत्माराम कराड हे विष्णू मुंडे यास समजावून सांगत असताना गावातील दीपक जीवराज नागरगोजे, प्रदीप उत्तम मुंडे, कृष्णा भीमराव मुंडे, अंगद रासेराव मुंडे व इतर दहा ते पंधरा लोक हातात तलवार, कोयते, काठी,दगड, घेऊन राहुल कराड यांच्या डाव्या डोळ्याच्या वर मारून गंभीर दुखापत केली. यावेळी त्यांचे मामा काशिनाथ पंडितराव मुंडे व वडील आत्माराम कराड हे सोडवा सोडवी करत असताना कृष्णा मुंडे, अंगद मुंडे, प्रदीप उत्तम मुंडे व इतर दहा ते पंधरा जणांनी काठीने व कोयत्याने गंभीर दुखापत केली. आरोपीतानी संगमत करून माझ्या वडिल व नातेवाईकांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने असुदेवीची यात्रेचा योग साधुन सांयकाळच्या वेळी अंधाराचा फायद्या मिळेल हा उद्देश समोर ठेवुन शिवीगाळ करून घातक हात्याराने हमला केला. परंतु काही यात्रेतील जमावातील लोक यांनी सोडवा सोडव केली म्हणुन आरोपीतानी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले व जाता जाता भविष्यात पुन्हा जिवे मारण्याची धमकी देली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राहुल आत्माराम कराड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विष्णू रासेराव मुंडे, दीपक जीवराज नागरगोजे, प्रदीप उत्तम मुंडे, कृष्णा भीमराव मुंडे, अंगद रासेराव मुंडे यांच्यासह दहा ते पंधरा आरोपी  विरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मारुती मुंडे हे करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement