Advertisement

जिल्हा बँक फसवणूक प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरु

प्रजापत्र | Thursday, 10/11/2022
बातमी शेअर करा

वडवणी दि. १० (प्रतिनिधी) -: बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणी २०१३ साली १६९ आरोपी विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.सदरिल प्रकराणातील आरोपी कोर्टात हजर राहत नसल्याने वडवणी न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत.अटक वॉरंट जारी केल्याने वडवणी तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.या प्रकरणातील ३ आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक करण्यात आली आसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे यांनी दिली आहे.

 

 

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधी रुपयांची लुट करून अनेक राजकीय नेत्यांनी आपले घर भरुन घेतले होते.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशानुसार व  तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.आरोपी न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कामकाजात सहकार्य करत नसल्याने वडवणी न्यायालयाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उघडला.व वडवणी तालुक्यातील १६९ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत. त्यापैकी तिघांना वडवणी पोलीसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी वडवणी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे.उर्वरित  आरोपींमध्ये वडवणी तील मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने एैन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.एन.आर.ढाकणे, पो.ह.ए.पी.कापले,पो.ह.ए.बी.तांदळे,पो.ना.ए.एन.अघाव,पो.ना.विलास खरात,पो.ना.अशोक केदार,पो.ना.महेश गर्जे,पो.कॉ.नितिन काकडे यांचे पथक रवाना झाले आहे. त्यामुळे वडवणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
 

Advertisement

Advertisement