Advertisement

आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणूकीचे बिकुल वाजले..

प्रजापत्र | Thursday, 10/11/2022
बातमी शेअर करा

आता गावागावात राजकीय फड रंगणार...

 

आष्टी (प्रतिनिधी) माहे नोव्हेंबर डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदती संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील सुमारे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम निवडणूक विभागाने नुकताच जाहीर केला असून यामध्ये यात आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतचा समावेश आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि.१८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आष्टी तालुक्यातील गावनिहाय यादीसह थेट जनतेतून सरपंचपदाचे आरक्षण केळ (सर्वसाधारण) ,खुंटेफळ (वा) (एस.सी.),नांदा(सर्वसाधारण),पुंडी (सर्वसाधारण महिला),भाळवणी (सर्वसाधारण महिला),मांडवा(एस.टी.महिला),वाहीरा(ए.सी.),सराटेवडगाव(ओबीसी महिला), हिंगणी(सर्वसाधारण महिला),अरणविहीरा (सर्वसाधारण महिला) , केळसांगवी (सर्वसाधारण महिला),घाटा (पिंप्री) (सर्वसाधारण महिला),पिंप्री (आष्टी) (सर्वसाधारण),फत्तेवडगाव (सर्वसाधारण महिला),बांदखेल(सर्वसाधारण महिला),बेलगाव (ओबीसी सर्वसाधारण) ,बोरुडी (सर्वसाधारण),शेकापूर(सर्वसाधारण महिला),सुलेमान देवळा (सर्वसाधारण ),कापसी (ओबीसी सर्वसाधारण),घोंगडेवाडी (ओबीसी महिला), चिंचाळा(सर्वसाधारण),देसुर(सर्वसाधारण),पिंप्री (घाटा)(सर्वसाधारण महिला),पोखरी(सर्वसाधारण),वाघळुज (सर्वसाधारण महिला),साकत (सर्वसाधारण महिला),खरडगव्हाण (सर्वसाधारण महिला), महिंदा(ओबीसी महिला),कानडी (खु)(सर्वसाधारण),कानडी (बु)(सर्वसाधारण),कारखेल (बु)सर्वसाधारण महिला,कोहिनी(सर्वसाधारण महिला),चिंचोली(एस.सी.महिला),चिंचपुर(सर्वसाधारण),बाळेवाडी(एस टी. महिला),वाळुंज(एसी. सी. महिला),शेडाळा(ओबीसी महिला),हनुमंतगाव(ओबीसी सर्वसाधारण),हाजीपुर(सर्वसाधारण),करंजी (सर्वसाधारण महिला),गंगादेवी *ओबीसी सर्वसाधारण),ठोबळसांगवी (ओबीसी महिला),पारोडी(सर्वसाधारण महिला),पाटसरा(सर्वसाधारण),पांगुळगव्हाण (ओबीसी सर्वसाधारण),पिंपळगाव दाणी (सर्वसाधारण),भातोडी(सर्वसाधारण महिला),उंदरखेल (सर्वसाधारण महिला),कारखेल (खु) (सर्वसाधारण महिला),कुंबेफळ(सर्वसाधारण),(निमगाव बोडखासर्वसाधारण),लमाणतांडा(वाघळुज)(सर्वसाधारणमहिला),लिंबोडी(ओबीसीसर्वसाधारण),वेलतुरी(सर्वसाधारण) शेरी (खु)(सर्वसाधारण),हातोळण(सर्वसाधारण महिला),पांगरा(ओबीसीमहिला),किन्ही(सर्वसाधारण महिला),खिळद (सर्वसाधारण महिला), गहूखेल (एसी.सी.महिला), टाकळसिंग(ओबीसी),धानोरा (सर्वसाधारण महिला), नांदूर (सर्वसाधारण महिला) ,मातावळी (सर्वसाधारण महिला), सालेवडगाव(ओबीसी),पांढरी(सर्वसाधारण), ब्रम्हगाव(सर्वसाधारण), साबलखेड(ओबीसी महिला),सांगवी(पाटण)(सर्वसाधारण),सुरुडी(एस.सी.), चिखली (एस.टी.),जळगाव(ओबीसी महिला), देवळाली(ओबीसीमहिला),देविनिमगाव (सर्वसाधारण महिला),दैठणा(सर्वसाधारण महिला),निमगावचोभा(ओबीसी), पिंप्री (घुमरी)(ओबीसी),सावरगाव घाट(एसी.सी.महिला),टाकळीअमिया(ओबीसी),डोंगरगण(ओबीसी),पिंपळगावघाट (सर्वसाधारण),बीडसांगवी (सर्वसाधारण महिला),मोराळा(सर्वसाधारण), अंभोरा(सर्वसाधारण),देऊळगाव घाट(सर्वसाधारण),बावी(सर्वसाधारण महिला),मंगरूळ(ओबीसी महिला),शिरापुर(ओबीसी महिला),हिवरा(ओबीसी महिला),खडकत(सर्वसाधारण महिला),जामगाव(सर्वसाधारण),तवलवाडी(सर्वसाधारण),पिंपरखेड(एसी.सी),मातकुळी(सर्वसाधारण),दादेगाव(सर्वसाधारण),लोणी (स)(महिला सर्वसाधारण),शिराळ(सर्वसाधारण), आष्टा ह. ना(ओबीसीमहिला), दौलावडगाव(ओबीसी), पारगाव जो.(एस.सी.),केळ(सर्वसाधारण), कासारीमुर्शदपुर(ओबीसीमहिला),धामणगाव(सर्वसाधारण महिला),कडा (सर्वसाधारण महिला),वंजारवाडी(ओबीसी),हाकेवाडी(ओबीसी),म्हसोबाचीवाडी(ओबीसी महिला), नागतळा(ओबीसी) केरूळ (एस. सी.महिला) या एकूण १०९ ग्रामपंचायतीचा समावेश असणार आहे अशी माहिती निवडणूक विभाग नायब तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली.

 

 

 

खेळी मेळी च्या वातावरणात निवडणूक व्हावात

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजला असून जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायत बीड तालुका व त्यानंतर आष्टी तालुक्यात आहेत.त्याअनुषंगाने आम्ही प्रशासनाच्यावतीने निवडणूकीसाठी सज्ज असून,आता होणा-या १०९ ग्रामपंचायतच्या निवडणूका ही शांततेत खेळी-मेळीत पार पडतील असा विश्वास तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement