परळी वै.९ (प्रतिनिधी)-परळी शहर व तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असूनपरळी शहर व परिसरातील वाढत्या चोऱ्याचे सत्र भीतीदायक बनले असून कोणत्याही चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने व चोरटे पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने या चोऱ्यांचे सत्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान परळी पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान चोरीच्या घटनांतून आता पत्रकारही होरपळून निघत आहेत. संपादक मोहन व्हावळे यांची मोटारसायकल रेल्वे स्थानक परिसरातून चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
पीसीएनचे संपादक, पत्रकार मोहन व्हावळे यांची हिरो कंपनीची मोटारसायकल क्रमांक एमएच (४४ एन.८३३५)परळी रेल्वे स्टेशनवरून मंगळवारी (दि.८) राञी १० वाजता चोरीला गेली आहे.परळी शहरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जनसामान्यांच्या अडचणी आपल्या वृत्तपत्रात मांडून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार बांधवांच्या मोटारसायकलचीच चोरी होत असेल तर सर्वसामान्यांचे काय?पोलिसांनी त्वरित या चोरीचा शोध लावला पाहिजे अशी मागणी होत आहे. घरफोड्या, वाहन चो-या, भुरट्या चो-यांचा परळीत धुमाकूळ सुरु आहे.कोणत्याही चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने व चोरटे पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने या चोऱ्यांचे सत्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान परळी पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.